धक्कादायक! मेंदू सूजला, फिट आली; कोरोना लस घेताच डॉक्टरसची अक्षरशः अवस्था झाली

796

धक्कादायक! मेंदू सूजला, फिट आली; कोरोना लस घेताच डॉक्टरसची अक्षरशः अवस्था झाली

सर्वात आधी आपात्कालीन मंजुरी (emergency use) मिळणाऱ्या कोरोना लशीचे (corona vaccine) असे गंभीर दुष्परिणाम दिसून आले आहेत.

मेक्सिको, 03 जानेवारी : गेल्या काही दिवसांपासून कोरोना लशीचे (corona vaccine) गंभीर दुष्परिणाम (side effect) समोर येत आहेत. ज्या कोरोना लशींना (Covid 19 Vaccine) आपात्कालीन मंजुरी (emergency use) देण्यात आली आहे, ती लस घेणाऱ्या लोकांमध्ये गंभीर समस्या दिसून आल्या आहेत. यामध्ये ताप येणं, त्वचेला सूज अशी लक्षणं दिसून येत होती. मात्र आता तर या लशीचे असे साईड इफेक्ट दिसून आले आहेत, ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

मेक्सिकोतील 32 वर्षीय महिला डॉक्टरमध्ये कोरोना लशीचे विचित्र असे दुष्परिणाम दिसून आले आहे. या डॉक्टरनं फायझर-बायोएनटेकची (Pfizer-BioNTech) कोव्हिड-19  लस घेतली. यानंतर या डॉक्टरची प्रकृती इतकी गंभीर झाली की तिला रुग्णालयात दाथल करण्यात आलं.

डॉक्टरला श्वास घ्यायला त्रास होऊ. सोबतच फिट्सही येत होत्या. त्वचेला खाज सुटली आणि इतर समस्याही दिसून आल्या. नूएवो लियोनमधील एका सरकारी रुग्णालयात आयसीयूमध्ये या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लशीच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये असे कोणतेही दुष्परिणाम झाल्याचे पुरावे सापडले नाहीत. कोणत्याच व्यक्तीच्या मेंदूत सूजही दिसली नाही.  ज्या महिला डॉक्टरमध्ये कोरोना लशीचे दुष्परिणाम दिसून आले आहे, तिला अॅलर्जिक रिअॅक्शन होत होती. या महिला डॉक्टरला सुरुवातीला एन्सेफॅलोमेलायटिस असल्याचं निदान झालं. ज्यामध्ये मेंदू आणि मणक्याला सूूज येते.

मेक्सिकोमध्ये 24 डिसेंबरपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्याचा पहिला टप्पा सुरू झाला होता.  दरम्यान फायझर आणि बायोएनटेकनं यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here