दोन कोटींपर्यंतच्या कर्जावरील व्याज रद्द करु : केंद्र सरकार

1046

दोन कोटींपर्यंतच्या कर्जावरील व्याज रद्द करु : केंद्र सरकार* ⚡ कोरोनामुळे आर्थिक अडचणीत अडकलेल्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. ?‍♂️केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात मोरॅटोरियम कालावधीतील (मार्च ते ऑगस्ट) व्याज रकमेवरील व्याज रद्द करण्याची तयारी दर्शवली आहे. ▪️दोन कोटींपर्यंतच्या कर्जाच्या व्याज रकमेवरील व्याज रद्द केले जाऊ शकते असे केंद्राने सांगितले आहे. ?लघु, लघु आणि मध्यम उद्योग ज्यांनी शैक्षणिक, गृहनिर्माण, ग्राहक वस्तू, वाहन कर्ज आणि क्रेडिट कार्डच्या थकबाकीसाठी कर्ज घेतले होते त्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे. ?केंद्र सरकारकडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. यावेळी केंद्राने परवानगीसाठी संसदेत प्रस्ताव मांडू अशी माहिती दिली. ?“सध्याच्या कोरोना संकटात व्याजाचे ओझे कमी करणे हा एकमेव मार्ग सरकारकडे आहे,” अशी माहिती केंद्राने प्रतिज्ञापत्रात दिली आहे. ?कर्जदाराने मोरॅटोरियम सुविधा घेतली होती की नव्हती हे ग्राह्य न धरता सर्वांनाच व्याज माफ केले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here