दीपिका पदुकोणला माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे सिद्ध करावे लागेल – उज्जवल निकम

    912

    दीपिका पदुकोणला माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे सिद्ध करावे लागेल – उज्जवल निकम

    मुंबई: व्हॉट्सअॅप चॅटवरून माल है क्या असं विचारणाऱ्या अभिनेत्री दीपिका पदुकोणला माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे सिद्ध करावे लागेल, तरच तिची या प्रकरणातून सुटका होईल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सरकारी वकील उज्जवल निकम यांनी व्यक्त केली. ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत करताना अॅड. उज्जवल निकम यांनी बॉलिवूड ड्रग्जप्रकरण आणि दीपिकाच्या व्हॉट्सअॅप चॅटवर प्रतिक्रिया व्यक्त केली. व्हॉटअप चॅटिंग हा डॉक्युमेंटरी पुरावा आहे. फिर्यादीला हे सिद्ध करावे लागेल की ते ड्रग्जचे सेवन करत नव्हते. माल हे क्या? म्हणजे नेमकं काय? माल म्हणजे ड्रग्ज नव्हे हे दीपिकाला सिद्ध करावं लागेल. दीपिका पदुकोण ही ग्रुपची अडमिन होती असे देखील तपासात पुढे आले आहे. तरी तिला हे सिद्ध करावे लागेल की हे चॅटिंग ड्रग्ज संदर्भात नव्हते, असं निकम म्हणाले

    रिया चक्रवर्तीची मॅनेजर ही ड्रग्ज पेडलर असल्याने व्हॉट्सअप चॅटिंगवरून पुढील काळात दीपिकाच्या अडचणीत वाढ होऊ शकते. परंतु NTBS कायद्यानुसार ड्रग्सचे सेवन करणं हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी 1 वर्षाची शिक्षा आणि 20 हजार रुपये दंड होऊ शकतो. परंतु, जर या तिन्ही अभिनेत्रींनी जर चुकीने ड्रॅग्ज सेवन झाल्याची कबुली दिली तर ते शिक्षेपासून वाचू शकतात, असंही निकम म्हणाले

    या अभिनेत्रींना एनसीबीने समन्स दिला आहे. कारण या प्रकरणाबाबत त्यांना अधिक पुरावे जमा करून या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाता येईल. आणखी तपास सुरू असल्यामुळे त्यांना शिक्षा होईल की नाही, असे सांगता येणार नाही. हा तपासाचा भाग असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here