दिवसभरातील महत्वाच्या बातम्या

454

-दिवसभरातील महत्वाच्या बातम्या*_

▪️ईडी प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा नाही. 3 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन याचिकेवर विचार करील. मनी लाँडरिंग प्रकरणात कोणताही दिलासा नाही. आपल्यासंदर्भातील कार्यवाही “दुर्दैवी” असल्याचा देशमुख यांचा दावा

▪️टोकियो ऑलिम्पिक : पी.व्ही. सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, सलग दोन सेट जिंकत शानदार विजय. नवनीत कौरचा धमाका; भारतीय महिला हॉकी संघाची आयर्लंडवर 1-0 नं मात, स्पर्धेतील आव्हान कायम. लवलीनानं रचला इतिहास, सेमीफायनलमध्ये एन्ट्री, महिला बॉक्सिंगमध्ये भारताचं पदक निश्चित.

▪️भारताचा माजी महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरची डिजिटल एन्टरटेनमेंट अँड टेक्नोलॉजी कंपनी जेटसिंथेसिस कंपनीत 20 लाख डॉलरची (जवळपास 14.8 कोटी रुपये) गुंतवणूक. पुण्यातील जेटसिंथेसिस कंपनीचे भारतासह जपान, ब्रिटेन, यूरोपीय संघ, अमेरिकेतही कार्यालये.

▪️सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर. अंतर्गत मूल्यमापनानुसार जाहीर निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्याचं प्रमाण 99.37 टक्के, असमाधानी विद्यार्थ्यांना पुनःपरीक्षेचाही पर्याय

▪️कायम पुराचा धोका असणाऱ्या गावांनी एकमताने ठराव करावा, पुनर्वसनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावू.. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आश्वासन.. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा..

▪️राज्य सरकारने पूरग्रस्तांना तातडीची मदत तात्काळ द्यावी.. पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांची मागणी, अनेक ठिकाणी लोकांनी 2019च्या पुरातील मदतीची आठवण काढल्याचा दावा..

▪️आमच्याविरोधात चुकीची माहिती पसरवणा-या पोस्ट हटविण्याचे निर्देश सोशल मीडियाला द्यावेत, शिल्पा शेट्टीची कोर्टात याचिका. मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारित बातम्या मानहानीकरक कशा?, मुंबई हायकोर्टाचा सवाल.

▪️दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 294 रुपये प्रति तोळा वधारले. सोने 47,442 रुपये प्रति तोळा, तर चांदीचे दर 170 रुपये प्रति किलोने घसरले. चांदी 66,274 रुपये प्रति किलोवर.

▪️कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी DGCA ने 31 ऑगस्टपर्यंत वाढविली. सर्व आंतरराष्ट्रीय कार्गो आणि विशेषतः डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाइट्सवर ही बंदी लागू नाही.
➖➖➖➖➖➖➖

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here