दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार नजरकैद

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार नजरकैद

    मुंबई – केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकाविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी ( भारत बंदची हाक दिलेली आहे. अशातच आम आदमी पक्षाने दिल्ली पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या निवास्थानी नजरकैद करण्यात आले असून हे सर्व गृह मंत्रालयाच्या आदेशावर करण्यात आल्याचा आरोप आपने केला आहे.

    भाजपच्या मदतीने दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांना घरातच नजरकैद केले आहे. सिंघू सीमेवरून परतल्यानंतर नरजरकैद सारखी परिस्थिती निर्माण करण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्व बैठक रद्द केल्या आहेत.

    तसेच, गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी दिल्लीच्या महानगरपालिकेच्या तीन महापौरांना अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्यास सांगितले. याचेच कारण पुढे करत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. यमामुळे अरविंद केजरीवाल यांची कोणीही भेट घेऊ शकत नाही आणि ते कोठेही बाहेर जाऊ शकत नाही, असा आरोप आपने केला आहे.

    उत्तर दिल्लीचे डीसीपी अँटो अल्फोन्स यांनी आपचे आरोप फेटाळून लावले आहेत. आम आदमी पक्ष आणि अन्य पक्षांमध्ये कोणताही संघर्ष होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिस आणि बॅरिकेड्स तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नजरकैद करण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण डीसीपी अँटो अल्फोन्स यांनी दिले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here