दाणादाण! ‘ह्या’ गावात मध्यरात्रीपर्यंत 162 मिलिमीटर पाऊस, अंधाराचे साम्राज्य, वसाहतींमध्ये पाणी

    869

    दाणादाण! ‘ह्या’ गावात मध्यरात्रीपर्यंत 162 मिलिमीटर पाऊस, अंधाराचे साम्राज्य, वसाहतींमध्ये पाणी

    अहमदनगर : सध्या पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीही झाली. नेवासे तालुक्यातील सोनईमध्ये पावसाने चांगलीच दाणादिन उडवली.

    गुरुवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत 162 मिलिमीटर (साडे सहा इंच) मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळला. या पावसाने सोनईच्या कौतुकी नदीला आलेल्या पुराचे पाणी गाव, पेठ व जवळच्या उपनगरातील वसाहतीमध्ये शिरले.

    रात्री दहा वाजता सोनईच्या अण्णाभाऊ साठेनगर मधील 15 कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. वरून मुसळधार पाऊस व खंडित वीजपुरवठ्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य होते.

    ध्वनिक्षेपक जीप फिरवून पाणी गावात घुसत असून कुणीही घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले. या कोसळलेल्या पावसाने सर्वत्र जलमय वातावरण पहायला मिळत होते.

    येथे साचले पाणी :- सोनई जवळचे शांताराम कॉलनी, बँक कॉलनी, शिक्षक कॉलनी, चपळे मळा, सिध्दीविनायक कॉलनी, धनगरगल्ली, अण्णाभाऊ साठे नगर, एकलव्य नगर या भागातील राहत्या घरांमध्ये पाणी घुसलेले असून

    व्यापारीपेठ व बाजारतळ व्यावसायिक भागात, सोनई-राहुरी रस्ता, सोनई-घोडेगाव रस्ता, नवीपेठ, शिवाजी महाराज रोड, अहिल्यादेवी चौक,

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here