दहा महिन्याच्या बाळाचे अपहरण; घराजवळच्या विहिरीत सापडला मृतदेह

979

राज्यात दिवसेंदिवस अपहरणाचे प्रमाण वाढत आहे. अशीच एक धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. दहा महिन्यांच्या बाळाचे अपहरण करून त्याला विहिरीत फेकून देण्यात आले. घराजवळच्या विहिरीत दहा महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आला. हे पाहून सातारकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
साताऱ्यातील फलटन तालुक्यात असलेल्या काळज गावात हि घटना घडली. ‘ओंमकार’ असं मृत मुलाचं आहे. त्रिंबक दत्तत्रय भगत असं मृत मुलाच्या वडिलांच नाव आहे. चार मुलींच्या पाठीवर झालेला ओमकार हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. घरातील मंडळी शेतीच्या कामासाठी गेली असता अज्ञात व्यक्ती घरात शिरल्या व त्यांनी चिमुकल्या ओमकारचे अपहरण केले.
नेमक काय घडलं ?
दहा महिन्याच्या ओमकारचे मंगळवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास अपरण झाले. भगत कुटुंबीय शेतीच्या कामासाठी गेले होते. त्यावेळीस काही अज्ञात व्यक्ती घरात शिरल्या. घरात शांत झोपलेल्या चिमुकल्या ओमकारचे त्यांनी अपहरण केले. त्या वेळीस ओमकारची मोठी बहिण घरातच होती. हा सर्व प्रकार तिने पाहिला. तिने आरडोओरड सुरू केली मात्र तो पर्यंत अपहरणकर्त्यांनी बाळाला पळवले होते. बाळाचे अपहरण करणाऱ्या अज्ञात व्यक्ती दुचाकी वरून आल्या होत्या. यात एक पुरूष आणि एका महिलेचा समावेश होता. दोघांचे वय २२ ते २५ वर्ष असावे असा गावकऱ्यांचा अंदाज आहे.
चिमुकल्याच्या अपहरणाची माहिती मिळताच लोणंद पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांनी बाळाचा कसून शोध सुरू केला. मात्र चिमुकल्या ओमकारचा शोध लागला नाही. शेवटी दहा दिवसाच्या चिमुकल्या ओमकारचा मृतदेह त्याच्या घराजवळील विहीरीत आढळून आला. या संपूर्ण प्रकारामुळे भगत कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांकडून संपूर्ण घटनेची तपासणी चालू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here