SSC, HSC Board Exam Date 2021: दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या; वर्षा गायकवाड यांची घोषणा SSC, HSC Board Exam
मुंबई: संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून राहिलेल्या दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. या परीक्षा आता जून महिन्यात घेतल्या जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड लवकरच यासंदर्भात घोषणा करण्याची शक्यता आहे