तृतीयपंथीयांच्या दोन गटात राडा ; एकमेकांना हाणले – ३० फूट खोल नदीत उडी घेतल्याने एक जखमी
आर्णी – कुठल्याही कार्यक्रमात जाऊन त्या ठिकाणी गाणे म्हणून,टाळ्या वाजवून आणि आपल्या विशिष्ट शैलीत लहान मुलांना आणि आबालवृद्धांना आशीर्वाद देऊन पैसे मिळवणे हा तृतीयपंथीयांचा व्यवसाय. बाजार ओळीत ठराविक सणाच्या दिवशी जाऊन हे लोक पैसा गोळा करतात. यांची बददुआ घेऊ नये यांचा आशीर्वाद नेहमी असावा जी गोष्ट समाजात फिरत असल्याने कोणीही सहसा यांना नाराज करत नाहीत. याच गोष्टीचा गैरफायदा घेत काही नकली तृतीयपंथी तयार झाले आहेत. हे लोक रेल्वे किंवा गर्दीच्या ठिकाणी फिरुन भीक मागतात. पैशे नाही दिले तर शिव्या देखील हासडतात. एखाद्याला एकटे पाहून त्याला लुटतात सुध्दा .
आर्णी येथे बाजाराचा दिवस असल्याने जवळपासच्या ३०-४० गावातील नागरिक या ठिकाणी येतात त्यामुळे शहरात चांगलीच गर्दी असते. यवतमाळ वरून काही तृतीयपंथी आर्णी येथे येऊन ते पैसे गोळा करीत होते.तत्पूर्वी याठिकाणी एक तृतीयपंथीयांची चमू पैसे गोळा करीत होती. या दोन्ही गटात नकली आणि असली वरून वाद सुरू झाला.या आपसातील वादा मुळे काही तृतीयपंथी अर्धनग्न झाले होते.भररस्त्यात हा प्रकार घडल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. या गटात हाणामारी झाल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते. बघ्यांची बरीच गर्दी जमली होती. दरम्यान एका तृतीयपंथी यांने ३० फुटावरून अरूणावती नदीत उडी मारल्याने तो जखमी झाला.
- Crime
- health
- महाराष्ट्र
- अहमदनगर
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- खेळ
- ठाणे
- देश-विदेश
- नवी मुंबई
- नागपूर
- नाशिक
- पुणे
- बारामती
- बीड
- मनोरंजन
- मुंबई
- राजकारण
- रायगड
- रोजगार
- लाईफस्टाईल
- व्यापार