तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा 11 ऑगस्ट रोजी लिलाव

591

जळगाव तहसील कार्यालयाने
जप्त केलेल्या वाहनांचा 11 ऑगस्ट रोजी लिलाव

जळगाव, (जिमाका) दि. 4 – जळगाव तालुक्यातील नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन व वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनमालकांविरुध्द तहसिलदार, जळगाव यांनी दंडात्मक कार्यवाहीची नोटीस व आदेश दिलेले आहेत. परंतु संबधित वाहनमालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांची जाहिर लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करण्यात येणार आहे. याकरीता या वाहनांचा बुधवार, 11 ऑगस्ट, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव येथे जाहिर लिलाव करण्यात येणार आहे. असे प्रसाद मते, उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
या वाहनांवर कोणत्याही फायनान्स कंपनी व बँकेचे कर्ज किंवा रक्कम येणे बाकी असेल तर अशा फायनान्स कंपनी व व बँकेने आपली हरकत जाहिरनामा प्रसिध्द होण्याच्या दिनाकांपासून सात दिवसाच्या आत लेखी स्वरुपात उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांचेकडे समक्ष दाखल करावी.
जास्तीत जास्त इच्छुक नागरीक, संस्थांनी या लिलावात भाग घ्यावा. लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या मालमत्तेची हातची किंमत, अनामत रक्कम तसेच लिलावाच्या अटी व शर्ती याकरिता उपविभागीय अधिकारी, जळगाव भाग, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, आवार, जळगाव यांचे कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असेही श्री. मते यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here