कोतवाली पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी नव्याने हजर झालेले पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांच्या तत्पर तपासामुळे विनयभंग करणाऱ्या त्या आरोपीला अवघ्या ३ तासात पकडण्याची धडकेबाज कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे.
न्यायालयात आरोपीस हजर केले असता त्याला सोमवारपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
कोतवाली पो.नि. संपत शिंदे यांच्या सूचनेनुसार उपनिरीक्षक सुखदेव दुर्ग, पोलीस कर्मचारी सुजय हिवाळे,योगेश भिंगारदिवे, दीपक रोहकले, योगेश कवाष्टे, तानाजी पवार, अमोल गाडे सोमनाथ राऊत, प्रमोद लहारे आदीच्या पथकाने ही धडकेबाज कारवाई केली आहे.याबाबत समजलेले माहिती अशी की, अल्पवयीन मुलीस गॅलरीमध्ये उभी असताना आरोपी गिरीष सुनिल वरकड (रा. बुरुडगाव रोड, नक्षत्रलॉन, अहमदनगर) याने मुलीला हातवारे करून तिला हाताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
त्यानंतर त्याने मुलीचा क्लासला जाता असताना तिचा पाठलाग करत होता सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मुलीच्या पाठीमागे तो आला. मला प्रेम आहे. तिला अहमदनगर येथे आणले नाहीतर कुटुंबाला जिवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. तो तेथून निघून गेला.
आरोपी गिरीष वरकड याने मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील त्याने मुलगी हिस स्नॅप चॅट ॲपवर ओळख करून मोबाईलच्या माध्यमातून वेळोवेळी फोन करून, मिसकॉल करून मेसेज करून मुलीचा छुपा पाठलाग करुन मुलीला हातवारे करीत. तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग केला.
शाळकरी मुलीची स्नॅप चॅट ॲपवर ओळख करून मोबाईलच्या माध्यमातून वेळोवेळी फोन करून मिस कॉल करून मेसेज करून तिचा छूपा पाठलाग करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न आरोपी गिरीश सुनिल वरकड याने केला. या फिर्यादीवरून भादवि 354 D, 506 अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचा तपास सुरु असताना पो. नि संपत शिंदे यांना माहिती मिळाली, आरोपी गिरीश सुनिल वरकड हा या दिल्लीगेट परिसरामध्ये मिळेल.
पो नि. श्री शिंदे यांनी तात्काळ पोलिस पथकाला सूचना दिल्या. पथकाने आरोपी याचा शोध घेऊन तीन तासात पकडले.आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवार (दि.6) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.