डोक्याला कट्टा लावत ‘छावा’च्या देवेंद्र लांबे यांना लुटले डॉ. मकासरेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल

506

डोक्याला कट्टा लावत ‘छावा’च्या देवेंद्र लांबे यांना लुटले
डॉ. मकासरेंसह साथीदारांवर गुन्हा दाखल
डोक्याला कट्टा लावत ‘छावा’च्या देवेंद्र लांबे यांना लुटले

छावा संघटनेचे देवेंद्र लांबे (Chhava Sanghatana Devendra Lambe) यांच्या डोक्याला गावठी कट्टा (Gavathi Katta) लावून खुन करण्याची धमकी (Murder threat) देत खिशातील 25 हजार रूपयांची रोकड व सोन्याची अंगठी लंपास केल्या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात (Rahuri Police Station) डॉ. विजय मकासरे (Dr. Vijay Makasare) व साथीदाराच्या विरोधात लांबे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल (Filed a crime) असून या घटनेमुळे राहुरी तालुक्यातील (Rahuri Taluka) वातावरण तणावपूर्ण झाले.

दरम्यान छावा संघटनेचे देवेंद्र लांबे (Chhava Sanghatana Devendra Lambe) हे वाघाचा आखाडा येथे आपल्या मित्राकडे जात असताना नंदिनी हॉटेलच्या (Nandini Hotel) जवळ दि .6 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास पाठीमागुन एका मोटारसायकलवर विजय अण्णासाहेब मकासरे (Vijay Annasaheb Makasare) हा व त्याचे पाठीमागे एक अनोळखी इसम असे आले. विजय मकासरे शिवीगाळ करुन गाडी साईटला घे असे म्हणुन लांबेंच्या गाडीचे समोरुन त्यांची मोटारसायकल आडवी लावली.

गाडीवरुन उतरुन पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने गचांडी पकडून तु लई …का तु आता जास्त समाजकार्य करतो काय असे म्हणून माझ्याशी झटापट केली. त्यावेळी विजय अण्णासाहेब मकासरे याने गावठी कट्टा लावून माझ्या कानावर लावला व मला म्हणाला तु लई समाजकारण करतोस काय तुझ्यावर अ‍ॅट्रोसिटी (Atrocity) करुन तुला संपवतो. असे म्हणून विजय मकासरे याने मला धरून तु जर हालचाल केली तर तुला गोळी घालुन संपवुन टाकीन अशी धमकी (Threat) दिली.

त्याचे सोबत असलेल्या अनोळखी इसमाने लांबे यांच्या पॅन्टच्या पाठीमागील खिशातील 25 हजार रुपये रोख व हातातील सोन्याची अंगठी (Gold ring) जबरदस्तीने काढुन घेतली त्यानंतर लांबे यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला असता विजय मकासरे याने माझी गचांडी पकडुन लांबे गळ्यातील सोन्याची चैन (Gold Chain) सुध्दा खेचण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा मुळे त्याठिकाणी रस्त्यावरुन जाणारे लोक जमा होवु लागल्याने ते दोघे त्यांचे मोटारसायकलसह पळुन गेले. व जाताना विजय मकासरे हा म्हणाला की तु जर माझे नादी लागला तर तुझ्यावर खोटे विनयभंगाचे गुन्हे दाखल करील व ते दोघे तेथुन निघून गेले.

देवेंद्र लांबे यांच्या फिर्यादीवरून डॉ. विजय अण्णासाहेब मकासरे याच्या विरोधात भादंवि.392,341, 504, 506, 34, 3, 25 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढिल तपास राहुरी पोलिस (Rahuri Police) करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here