
दावते इस्लामी हिंदचे सदस्य व विश्वस्तांची पोलीस अधीक्षकांकडे धाव.नगर (प्रतिनिधी)- शहरातील मुस्लिम समाजाचे दावते इस्लामी हिंद ट्रस्टने शहरानजीक असलेल्या मौजे पोखर्डी येथे गट नंबर. 164 शेत्र 4 गुंठे जागा असून सदर जागा ही गजराज नगर मिरावली पहाड कडे जाणाऱ्या रस्त्या लगत असून ही जागा मुस्लिम धर्माचे धार्मिक कार्यक्रम करण्याकरिता घेतलेली होती व आहे सदर जागा ही खरेदी खत करून 26 ऑक्टोबर 2018 मध्ये खरेदी घेतलेली आहे सदर जागेवर बांधकाम करण्यासाठी रितसर परवानगी देखील मागितलेली आहे. परंतु काही दिवसांनी ताबा टोळीचा ताबा मारण्याचा व प्लॉट बळकवण्याचा उद्देशाने प्लॉटचे कंपाउंड तोडून प्लॉट भोवती चारी मारण्याचे काम काही समाजकंटकांकडून होत आहे.

तरी या ताबा मारी समाजकंटकांच्या टोळींवर व त्यांच्या म्होरक्यांवर मोक्का अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दावते इस्लामी हिंद ट्रस्टचे सदस्य अब्दुल सत्तार इस्माईल शेख व विश्वस्तांनी पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे.शहरात व ठिकठिकाणी ताबामारी टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेली आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना या ताबा टोळी कडून त्रास होत असून यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्याने परत ही टोळी गोरगरिबांचे जमिनी हडपणार नाही.