झटपट बातम्या
शिल्पा शेट्टीचा 29 मीडिया हाऊसवर खटला दाखल
शिल्पा शेट्टीची हायकोर्टात धाव, शिल्पा शेट्टीने 29 मीडिया हाऊसवर 25 कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला. अनेक न्यूज चॅनेल, वेबसाइट्स, यूट्युब, गुगल आणि फेसबुकवर केले आरोप
आता मराठीतून इंजिनिअरिंग, 5 भारतीय भाषांचा पर्याय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी यानिमित्त शिक्षण क्षेत्रातील काही नव्या योजनांचा शुभारंभ केला. म्हणाले, “आता 8 राज्यांतील 14 अभियांत्रिकी महाविद्यालये 5 भारतीय भाषांमध्ये इंजिनिअरिंग शिकवण्यास सुरुवात करत आहोत. यात हिंदी, मराठी, तामिळ तेलगू आणि बंगाली भाषेचा समावेश आहे. इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचा 11 भारतीय भाषांत अनुवाद करण्यासाठी एक विशेष टूलही विकसित करण्यात आले आहे.
प्रभास-पूजा हेगडे यांचा ‘राधेश्याम’ चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होणार
चित्रपट 14 जानेवारी 2022 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘राधेश्याम’ आणि प्रभासचे चाहते आतुरतेने वाट पहात होते. या चित्रपटाच्या नवीन पोस्टरसह त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. .
पेगाससवरुन संसदेत गदारोळ_
पेगासस हेरगिरी प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि महागाईवरुन विरोधी पक्ष आक्रमक होत आहे. यापूर्वी पहिल्यांदा राज्यसभा 12 वाजेपर्यंत आणि नंतर अडीच वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. लोकसभेचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले गेले होते.
? जाणून घ्या देशातील आजची कोरोना स्थिती (30 जुलै रोजी स. 9.29 वाजता)
▪️एकूण सक्रिय रुग्ण : 3,99,311
▪️एकूण कोरोनामुक्त रुग्ण : 3,07,36,249
▪️ कोरोनामुळे आतापर्यंत एकूण मृत्यू : 4,23,244