ज्योती क्रांती मल्टीस्टेट – ब्रेंड ॲम्बेसेडर पदी अभिनेत्री मधुरा देशपांडे
ज्योती क्रांती को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. या अर्थिक क्षेत्रात अग्रेसर असणऱ्या मल्टीस्टेटच्या ब्रेंड ॲम्बेसेडर पदी सिने-मालिका अभिनेत्री मधुरा देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली. “महाराष्ट्र राज्यात ज्योती क्रांतीचे अर्थकार्य हे खरोखरच खुप कौतुकास्पद असुन सर्व सामान्यांच्या विश्वासाच नातं जपण्यात संस्था उत्तरोत्तर प्रगती करत आहे, ज्योती क्रांती परिवाराचा एक भाग होणे हे मी माझे भाग्य समजते”.ज्योती क्रांतीच्या अर्थ क्रांतीचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार होणे हेतु पुढील काळात मी प्रयत्नशील असणार आहे. महिला सक्षमीकरण आणि लघु उद्योगांना चालना मिळण्यासाठी ज्योती क्रांती सोबत काम करण्याचा शब्द मधुराने याप्रसंगी दिला.असे मत आपल्या मनोगतात अभिनेत्री मधुराने व्यक्त केले. जीवलगा , झुंज, रंग माझा वेगळा, असे हे कन्यादान या काही गाजलेल्या मराठी मालिका आहेत मधुराच्या, तसेच गुलाब जाम आणि बस स्टॉप या चित्रपटातुन ही आपला अभिनयाने चित्रपट रसिकांना मधुराने मत्रमुग्ध केले आहे.
ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे चेअरमन मा.श्री.आजिनाथ हजारे, व्यवस्थापक श्री.किरण वर्पे यांनी अभिनेत्री मधुरा देशपांडेचा सत्कार करुन ज्योती क्रांतीच्या कॉर्पोरेट ऑफीसच्या दालनात स्वागत केले. याप्रसंगी अभिनेत्री मधुराने संस्थेच्या कार्यद्धती समजून घेत ज्योती क्रांतीच्या सेवा- सुविधांची पाहणी केली. सर्वसामान्यांना अर्थिक क्षेत्रात तत्पर सेवा देताना कशा पध्दतीने कामकाज चालते याचा आढावा याप्रसंगी मधुरा देशपांडेना समजुन सांगण्यात आला. याप्रसंगी सिने-मालिका दिग्दर्शक श्री.संकेत पावसे, ब्रेंड मेकर चे संचालक श्री.किरण गवते, BVM ईन्व्हेस्टमेंट ॲण्ड सिक्युरिटि प्रा.लि. संचालक अभिजित हजारे , निवेदक प्रसाद बेडेकर आणि ज्योती क्रांतीचे सर्व कर्मचारी, पिग्मी कलेक्शन एजंट,खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- ज्योती क्रांती परिवार,
महाराष्ट्र राज्य