ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणत आहेत – जया बच्चन
नवी दिल्ली | बॉलिवूड इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं काही लोक काम करत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत केला आहे. सभागृहात शून्य प्रहराला त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडला. यावेळी त्यांनी भाजप खासदार रवि किशन यांना जोरदार टोला लगावला आहे. रवी किशन यांनी लोकसभेत इंडस्ट्रीतील कलाकारांकडून ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर चित्रपटसृष्टीत काम करणारे लोकसभेचे एक सदस्य काल इंडस्ट्रीविरोधात बोलत होते. हे लज्जास्पद असल्याचं जया बच्चन यांनी म्हटलं आहे.
केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही. ज्या ताटात खातात, त्याच ताटात नंतर छेद करतात, असं म्हणत जया बच्चन यांनी टीका केली आहे.
दरम्यान, ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणत आहेत याला माझा विरोध राहिलं, असं म्हणत जया बच्चन यांनी अभिनेत्री कंगणा रावणातवर सुद्धा निशाणा साधला आहे.