जिल्ह्यात 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान फिरत्या लोकअदालतीचे आयोजन

690

जिल्ह्यात 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान फिरत्या लोकअदालतीचे आयोजन

सातारा दि.9 (जिमाका): सातारा जिल्ह्यामध्ये दि. 9 ते 30 ऑगस्ट 2021 या कलावधीमध्ये फिरते लोक दालत आयोजित करण्यात आली असून या फिरत्या लोकअदालतीकरीता निवृत्त न्यायाधिश राजेपांढरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या फिरते लोकअदालत वाहनाचे पूजन निवृत्त न्यायाधिश राजेपांढरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच डायसचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधिश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते करण्यात आल्याची माहिती वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव विधी सेवा प्राधिकरण, सातारा एस.बी. देसाई यांनी दिली आहे.
या उद्घाटन प्रसंगी सर्व जिल्हा न्यायाधीश, वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश आणि कनिष्ठ न्यायाधीश तसेच वकील संघाचे अध्यक्ष अरुण खोत, जिल्हा न्यायालयाचे व्यवस्थापक काळे, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक जोशी, विधीज्ञ, विधी स्वयंसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवा ध्वज दाखवून फिरते लोकअदालत वाहन कोरेगावकडे रवाना करण्यात आले.
या फिरते लोकअदालत वाहन 9 तालुक्यात फिरणार असून तडजोडी आधारे गावात जावून प्रकरणे निकाली करणार आहेत. यामध्ये दि. 9 ऑगस्ट 2021 रोजी मौजे तडवळे ता. कोरेगाव, दि. 11 ऑगस्ट 2021 रोजी मौजे गुरसाळे ता. खटाव, दि. 14 ऑगस्ट 2021 रोजी मोगराळे ता. माण, दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी मौजे खुटबाब ता. माण, दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी मौजे जाधववाडी ता. फलटण, दि. 21 ऑगस्ट 2021 रोजी मौजे अंधोरी ता. खंडाळा, दि. 24 ऑगस्ट 2021 रोजी मौजे सुरुर ता. वाई, दि. 26 ऑगस्ट 2021 रोजी मौजे सरताळे ता. जावली, दि. 30 ऑगस्ट 2021 रोजी मौजे मसूर ता. कराड या ठिकाणी विधी साक्षरता शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी मौजे कोरेगाव, दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी मौजे खटाव, दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी मौजे वावरहिरे ता. माण, दि. 18 ऑगस्ट 2021 रोजी मौजे विडणी ता. फलटण, दि. 20 ऑगस्ट 2021 रोजी मौजे खेड ता. खंडाळा, दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी मौजे केंजळ ता. वाई, दि. 25 ऑगस्ट 2021 रोजी मौजे कुडाळ ता. जावली आणि दि. 27 ऑगस्ट 2021 रोजी मौजे उंडाळे ता. कराड या ठिकाणी न्याय आपल्या दारी या संकल्पनेच्या माध्यमातून फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी आपली प्रकरणे फिरते लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने निकाली करावीत असे आवाहन वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा प्रभारी सचिव विधी सेवा प्राधिकरण, सातारा एस.बी. देसाई यांनी केले आहे. या दौऱ्याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिरण, सातारा येथे संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. देसाई यांनी केले आहे.
0 0 0 0

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here