जिल्हास्तरीय महसूल दिन साधेपणाने संपन्न
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अनोख्या संकल्पनेतून
कु.साक्षी आयरेकर या निराधार विद्यार्थीनीच्या हस्ते गौरविण्यात आले
उत्कृष्ट काम केलेल्या महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना
अलिबाग,जि.रायगड, दि.12 (जिमाका):- महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार जिल्हा स्तरावरील महसूली कामे वेळच्या वेळी पूर्ण करून त्यानुसार अभिलेख अद्यावत करणे, वसुलीच्या नोटीसा पाठविणे, मोजणी करणे, अपील प्रकरणांचा निपटारा करणे इत्यादी कामे वेळेच्या वेळी व वेळापत्रकानुसार करणाऱ्या आणि महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याकरिता तसेच महसूल विभागाने केलेल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्याकरीता दि. 01 ऑगस्ट हा दिवस “महसूल दिन” म्हणून साजरा करण्यात येतो.
तथापि, रायगड जिल्ह्यात दि. 21 व 22 जुलै 2021 रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे व दरड कोसळल्यामुळे महाड व पोलादपूर तालुक्यांतील जनजीवन विस्कळीत झाले. मौजे तळीये, ता. महाड व ता. पोलादपूर येथे काही गावात दरड कोसळून जीवित व वित्तहानी झाली. या संवेदनशील कारणास्तव यावेळी जिल्हास्तरीय महसूल दिन दि.06 ऑगस्ट 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात अतिशय साधेपणाने पार पाडला.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव म्हस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपविभागीय अधिकारी सर्वश्री दत्तात्रय नवले, विठ्ठल इनामदार, अमित शेडगे, प्रशांत ढगे, डॉ.यशवंत माने, श्रीमती प्रतिमा पुदलवाड, प्रशाली दिघावकर,वैशाली ठाकूर यांच्या तहसिलदार सतिश कदम, तहसिलदार विशाल दौंडकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस माहे जुलै, 2021 मध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम एसओएस चिल्ड्रन्स व्हिलेज, अलिबाग येथील कु.साक्षी आयरेकर या निराधार विद्यार्थीनीच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून कु.साक्षी आयरेकर यांनाच मान देण्यात आला. ही विद्यार्थीनी 12 वी सायन्स (PCM) कक्षेत शिकत असून तिला सॉफ्टवेअर इंजिनिअरींगमध्ये बीटेक करण्याची इच्छा आहे.
कार्यक्रमाच्या वेळी करोना काळात व नैसर्गिक आपत्तीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पुढील महसूल अधिकारी/कर्मचाऱ्यांना कु.साक्षी आयरेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून पुरस्कृत करण्यात आले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
करोना काळात व नैसर्गिक आपत्तीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेले महसूल अधिकारी/कर्मचारी :-
उपविभागीय अधिकारी रोहा श्री.यशवंतराव वसंतराव माने, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली गंगाराम माने, तहसिलदार (महसूल) श्री.विशाल यशवंतराव दौंडकर, पनवेल तहसिलदार श्री. विजय शिवाजीराव तळेकर, तहसिलदार सुधागड श्री. दिलीप जक्काप्पा रायण्णावार, पोलादपूर नायब तहसिलदार श्री.समीर दिवाकर देसाई, उपविभागीय अधिकारी कार्यालय,पेण अव्वल कारकून श्रीम. साक्षी संतोष कवडे, तहसिल कार्यालय, महाड, मंडळ अधिकारी खरवली श्री. गोपाळ गोविंद पवार,उपविभागीय अधिकारी कार्यालय, पनवेल महसूल सहाय्यक श्रीम. स्वाती सुभाष सावंत, तहसिल कार्यालय, पोलादपूर तलाठी श्री.अशोक पांडुरंग बनसोडे, तहसिल कार्यालय, कर्जत तलाठी श्रीम. भूमिका भारत लदगे, तहसिल कार्यालय, श्रीवर्धन वाहनचालक श्री. अजय लक्ष्मण दाते, तहसिल कार्यालय, पेण शिपाई श्री. पांडुरंग यशवंत म्हात्रे, तहसिल कार्यालय,तळा कोतवाल श्री. किशोर चोगले,तहसिल कार्यालय, पोलादपूर पोलीस पाटील श्री. सुरेश रामचंद्र जंगम, तहसिल कार्यालय, मुरुड पोलिस पाटील श्री विश्वास भास्कर महाडीक.
०००००००