सोन्याचा भाव , जाणून घ्या आज किती रुपयांनी महागले सोने

803

कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव पुन्हा एकदा ४८००० रुपयांच्या दिशेनं वाटचाल करू लागला आहे. आज बुधवारी सोने आणि चांदीने सकारात्मक सुरुवात केली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सकाळच्या सत्रात सोन्याचा भाव ७० रुपयांनी वधारला तर चांदीमध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे.

सध्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव ४७६२९ रुपये प्रती १० ग्रॅम आहे. त्यात ५६ रुपयांची वाढ झाली आहे. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४७६८९ रुपये इतका वाढला होता. कालच्या मोठ्या घसरणीतून आज चांदी सावरली आहे. आज चांदीचा भाव २७९ रुपयांनी वधारला असून तो ६६३३५ रुपये झाला आहे.

एमसीएक्सवर मंगळवारी बाजार बंद होताना सोने ६३ रुपयांनी वधारले होते. सोन्याचा भाव ४७५२४ रुपयांवर स्थिरावला होता. चांदीमध्ये मात्र १००१ रुपयांची घसरण झाली आणि चांदीचा भाव ६६११२० रुपयांवर बंद झाला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी सोने दरात घसरण झाली आहे. आज मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६६५० इतका आहे तर २४ कॅरेटचा भाव ४७६५० रुपये आहे. दिल्लीत आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७४० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०९९० रुपये आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५०३० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१३० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६८७० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९१८० रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here