जया बच्चन यांच्या समर्थनात सोनम कपूर आणि फरहान अख्तर
मुंबई : अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्यावरून सोनम कपूर त्यांच्या समर्थनात समोर आली आहे. जया बच्चन नुकत्याच राज्यसभेत म्हणाल्या होत्या की, जे लोक बॉलिवूडमध्ये नाव कमवतात, तेच लोक पुढे जाऊन बॉलिवूडच्या प्रतिमेला धुळीस मिळवतात. त्यांनी नाव न घेता अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता रवि किशन यांना टोमणा मारला होता. रवि किशन सभागृहात म्हणाला होता की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये ड्रग्सचं सेवन होतं. फिल्ममेकर अनुभव सिन्हा याने जया बच्चन यांची प्रशंसा केली आहे आणि त्यांच्या व्हिडीओची क्लिप शेअर करत लिहिले की, ‘जयाजी यांना सादर प्रणाम करतो. ज्यांना माहीत नाही, त्यांनी हे बघा. पाठिचा कणा असतो दिसतो’.
सोनम कपूर – फरहान अख्तरचं
अनुभव सिन्हाच्या ट्विटवर रिप्लाय करत सोनम कपूरने लिहिले की, ‘जेव्हा मी मोठी होईल तेव्हा मला असं बनायचंय’. फरहान अख्तरने जया बच्चन यांचं कौतुक केलं आणि लिहिलं की, ‘रिप्सेक्ट. जेव्हाही गरज असते, त्या अशा मुद्द्यांवर उभी राहतात
काय म्हणाल्या होत्या जया बच्चन?
बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव रचला जात आहे. मनोरंजन क्षेत्र दिवसाला ५ लाख लोकांना रोजगार देते. देशाची आर्थिक स्थिती बिकट आहे आणि अन्य गोष्टींपासून लक्ष हटवण्यासाठी बॉलिवूडचा वापर केला जात आहे. सोशल मीडियात बॉलिवूडला निशाणा बनवला जात आहे. आम्हाला सरकारकडून समर्थन मिळत नाही. ज्या लोकांना या फिल्म इंडस्ट्रीजने नाव दिलं आज तेच बॉलिवूडला गटार संबोधत आहेत मी याचं समर्थन करणार नाही असं खासदार जया बच्चन राज्यसभेत म्हणाल्या.
तसेच या उद्योगात असे काही लोक आहेत जे सर्वाधिक कर भरतात. पण त्यांना त्रासही दिला जात आहे. चित्रपटसृष्टीसाठी अनेक आश्वासने दिली गेली परंतु ती कधीच पूर्ण झाली नाहीत. सरकारने मनोरंजन क्षेत्राच्या समर्थनात यावे. ही इंडस्टी नेहमी सरकारला मदत करण्यासाठी पुढे आली आहे. सरकारची कोणतीही चांगली कामे असतील त्याचे आम्ही समर्थन करतो. जेव्हा आपत्ती येते तेव्हा फक्त बॉलिवूडचे लोक पैसे देतात असं जया बच्चन म्हणाल्या. त्याचसोबत सरकारने मनोरंजन क्षेत्राला मदत केली पाहिजे. काही वाईट लोकांमुळे आपण संपूर्ण बॉलिवूडची प्रतिमा खराब करू शकत नाही. सोमवारी लोकसभेत एका खासदाराने बॉलिवूडविषयी निवेदन दिले. जे स्वतः बॉलिवूड इंडस्ट्रीतील आहेत. हे लाजिरवाणे आहे. ज्या ताटात जेवतो त्यालाच छिद्र करतो हे चुकीचे आहे. उद्योगाला शासनाची साथ गरजेची असते असंही त्या म्हणाल्या होत्या.