जगातील सर्वात मोठ्या कंपनीच्या चेअरमनचं निधन

नवी दिल्ली – जगभरात नावलौकिक असलेल्या सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्सचे अध्यक्ष ली कुन-ही यांचं निधन झालं आहे. त्यांचे वय 78 वर्ष होते. याबाबत कंपनीने अधिकृतपणे माहिती दिली आहे.

ली कुन-ही यांनी दक्षिण कोरियाच्या एका कंपनीला प्रख्यात टेक कंपनीत बदलले होते. सॅमसंग ही जगातील मोठी कंपनी आहे. दक्षिण कोरियाच्या आर्थिक बळकटीमध्ये सॅमसंगचा मोठा वाटा आहे.

ली यांना सहा वर्षापूर्वी 2014 मध्ये ऱ्हदयविकाराचा झटका आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर कंपनीची जबाबदारी ली यांचा मुलगा आणि सॅमसंग इलेक्ट्राॅनिक्सचे उपाध्यक्ष ली जाॅय-यंग यांच्यावर सोपवण्यात आली होती.

सॅमसंग कंपनी ही दक्षिण कोरियासह संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भारतात सॅमसंग कंपनीचे स्मार्टफोन मोठ्या प्रमाणात विकले जातात. भारतात टाॅपच्या स्मार्टफोन विक्रीच्या लिस्टमध्ये सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात मागील अवघ्या 3 महिण्यात जवळपास एक कोटी स्मार्टफोनची विक्री करण्यात आली आहे. सॅमसंगचा भारतात 20.4 टक्के शेअर मार्केटवर कब्जा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here