भारत हा विस्तारवादी देश नसून शांतीप्रिय देश आहे, त्यामुळे भारताच्या जमिनीवर नजर ठेवणाऱ्यांना ठोस प्रत्युत्तर दिलंय जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लडाखच्या भूमीवर जाऊन चीनला ठणकावले होते. मात्र, अद्यापही लडाखच्या सीमारेषेवर भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे.
भारताने सातत्याने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यातच, राफेल विमानाने भारतीय वायूदलात एंट्री केल्याने देशाची ताकद आणखी वाढली आहे. त्यातच, भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्र देण्याची तयारी सुरू आहे.
भारता-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रांस्त्रांनी सज्ज करण्याची तयारी सुरू आहे. आयटीबीपीच्या 59 व्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने दलातील जवानांना संबोधित करताना, केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी चीनवर हल्लाबोल केला. त्यासोबतच, भारत-तिबेट सीमा पोलीस दलास नवीन शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कुणाचेही नाव न घेता त्यांनी चीनला ठणकावले.