जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाचे उगमस्थान असणाऱ्या चीनने आता भारतासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. चीनने भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांना देशात प्रवेशबंदी केली आहे. चीनी व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या भारतातील सर्व परदेशी नागरिकांना हा निर्णय लागू असणार आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. चीनने घेतलेला हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपासाठी आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला असल्याचे चीनकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावरही स्थगिती आणली आहे. ? चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यासंबंधी अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यानुसार, भारतात असणाऱ्या चिनी दुतावासाकडून व्हिसा किंवा रेसिडन्स परमिट असणाऱ्या नागरिकांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही. आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश मिळू इच्छिणारे चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. 3 नोव्हेंबर नंतर व्हिसा दिलेल्यांना कोणताही अडथळा येणार नाही.
ताजी बातमी
महापालिका निवडणूक जाहीर..
बऱ्याच दिवसापासून रखडलेल्या महानगरपालिका आता महिन्याभरातच पूर्ण होणार.
अखेर निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम केला...
नगर जिल्ह्यातील दोन ग्रामसेवक निलंबित ; विस्तार अधिकाऱ्यासह एका ग्रामसेवकाला दोन वेतन वाढी रोखण्याची...
कामात हालगर्जीपण दोन ग्रामसेवक थेट निलंबित
विस्तार अधिकाऱ्यासह एका ग्रामसेवकाला दोन वेतन वाढी रोखण्याची...
दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी अहिल्यानगर जिल्हा परिषद संकेतस्थळावर प्रसिध्द
अहिल्यानगर - दिव्यांग विभागाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या महिनाभरात जिल्हाभरातील अंपग कर्मचाऱ्यांच्या केलेल्या पडताळणीत जिल्ह्यात 550...
चर्चेत असलेला विषय
मुख्य बाजार नेप्तीला हलवण्याचा आमदारांचा सोयऱ्यांच्या मदतीने डाव – किरण काळे ;
शहराचे नुकसान होऊ देणार नाही, काँग्रेस व्यापाऱ्यांच्या पाठीशी
प्रतिनिधी : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मुख्य बाजार हा नेप्तीच्या...
टीएमसी नेते साकेत गोखले यांच्या अटकेनंतर काही तासांनी परेश रावल यांना ‘बंगाली’ उपहासासाठी समन्स
कोलकाता: सीपीआय(एम) नेते मोहम्मद सलीम यांच्या तक्रारीनंतर अभिनेते-राजकारणी बनलेले परेश रावल यांच्याविरुद्ध “दंगली भडकावल्याबद्दल” एफआयआर दाखल करण्यात...
लोणी पोलीस ठाणे हद्दीत,कोल्हार बुद्रूक , ता- राहाता येथे जुगार अड्डयावर छापा , रोख...
लोणी पोलीस ठाणे हद्दीत,कोल्हार बुद्रूक , ता- राहाता येथे जुगार अड्डयावर छापा , रोख रक्कम , मोबाईल , दुचाकी व चारचाकी वाहनासह...
कोविड प्रकरणे: भारतात 24 तासांत 10,000 हून अधिक प्रकरणांसह संसर्ग वाढताना दिसत आहे
19 एप्रिल रोजी भारतात कोविड-19 प्रकरणांमध्ये वाढ झाली असून 24 तासांत एकूण 10,542 प्रकरणे नोंदली गेली आहेत,...




