तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या किमती मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ केली आहे.
सर्वसामान्य घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलेंडर किंवा गाडीमध्ये लागणारे पेट्रोल-डिझेल या अत्यावश्यक गोष्टी असतात.
याच गॅस सिलेंडरच्या किंमती आता थेट 50 रुपयांनी वाढल्या आहेत.
या वाढलेल्या किमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र आठ दिवसापासून स्थिर असल्याने लोकांमध्ये दिलासा मिळाल्याचे वातावरण आहे.
दिल्लीमध्ये गॅस सिलेंडर आता 644 रुपयांना मिळणार आहे. कोलकत्ता मध्ये 670 रुपये 50 पैसे, मुंबईमध्ये 644 तर चेन्नई मध्ये गॅस सिलेंडर साठी आता सर्वसामान्यांना 660 रुपये मोजावे लागणार आहेत.
केवळ दोन आठवड्यातच तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडर च्या किमती मध्ये 100 रुपयांची वाढ केली आहे.
डिसेंबर मध्ये जर तुम्ही गॅस बुकिंग करणार असाल तर आजपासून तुम्हाला 100 रुपये अधिक द्यावे लागतील. ही वाढ विनाअनुदानीत 14.2 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक सिलेंडरवर केली गेली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖