गोर-गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या शिक्षणाचा विचार केंद्रशासनाने करावा – सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर
देशाचा कणा असलेल शिक्षण क्षेत्र पुन्हा सुरू करण्याची मागणी
कोरोना covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने संपूर्ण देश हा लॉकडाऊन करण्याचे घोषित केले. या लॉकडाऊन च्या कालखंडात विद्यालय-उच्चमाध्यमिक विद्यालये यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू केली.ज्या विध्यार्थ्यांच्या पालकांची मोबाईल घेऊन देण्याची ऐपत आहे अश्या पालकांनी मुलांना मोबाईल फोन घेऊन दिले आहे व ते विध्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.पण महानगर पालिका किंवा गरीब घरातील विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न उपस्थित झाला.एक वेळेच्या अन्नासाठी महाग असलेले काही घटक एवढे महागडे मोबाईल फोन कशे घेणार आणि त्यातून शिक्षण कसे घेणार हा प्रश्न आज सामान्य विध्यार्थ्यांच्या जिवनात निर्माण झाला.
तर तज्ज्ञांच्या मते जास्त मोबाईल चा वापर हा भावी आयुष्यात त्रासदायक आहे त्या वापरामुळे भविष्यामध्ये विध्यार्थ्यांच्या डोळ्यांचा कींव्वा मणक्यांच्या त्रासाच्या तक्रारी वाढतील हे टाळता येणार नाही.
तरी या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वसामान्य विध्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी विनंती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हेल्पिग हँडस युथ फाउंडेशन च्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली