गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची सीबीआय चौकशी का करावीशी वाटली नाही
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणामध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपाला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी टोला लगावला आहे.
❓ भाजपाचे नेते गोपिनाथ मुंडे यांचा अचानक मृत्यू झाला तेव्हा भाजपाला त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी असे का वाटले नाही, अशी विचारणा गुलाबराव पाटील यांनी केली आहे.
? राष्ट्रपतीसारख्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीचा कार्यक्रम माध्यमांवर मिनिट टू मिनिट दाखवला जातो. परंतु, सुशांतसिंग राजपूत आणि कंगना यांच्या बाबतीत आता माध्यमे मिनिट टू मिनिट कार्यक्रम दाखवत आहेत. हे अयोग्य आहे. सुशांतने काय देशासाठी हौतात्म्य पत्करले आहे का? तो दारू, सिगारेट घेणारा होता.
? 52 टक्के रोजगार देणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कधी सीआयडी चौकशी होत नाही. एवढेच काय तर गोपीनाथ मुंडेंसारख्या बड्या नेत्याच्या मृत्यूची सीआयडी चौकशी भाजपला का करावीशी वाटली नाही?
? बिहारमध्ये राजपूत समाजाची मते हवी असल्यानेच भाजपकडून असे राजकारण सुरू आहे. यांच्या टाळूवरचे लोणी खाऊन भाजपला सत्ता मिळवायची आहे. म्हणूनच भाजपचे हे थोतांड सुरू असल्याचा घणाघात देखील गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.SHOW LESS