गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज राज्य राखीव पोलीस बल, गट क्र. ११, नवी मुंबई कॅम्प बाळेगांव येथे भेट दिली. राज्य राखीव पोलीस बलातील संख्याबळ, कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त व इतर कामांचा त्यांनी आढावा घेतला.

तसेच गटमुख्यालयात नव्याने उभारण्यात आलेला कंपोस्ट खत प्रकल्प, शेततळे इत्यादी ठिकाणी गृहमंत्र्यांनी भेट दिली. त्यानंतर पोलीस वसाहतीमध्ये जाऊन पोलीस कुटुंबियांच्या समस्या जाणून घेतल्या.