क्रिकेटर युझवेंद्र चहलची विकेट पडली; कोरिओग्राफर धनश्री वर्मासोबत विवाहबद्ध!
? भारतीय क्रिकेट संघाचा स्टार स्पिनर युजवेंद्र चहलने धनश्री वर्मा धनश्री वर्मासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचे काही फोटो शेअर करत या दोघांनी स्वतः आपल्या लग्नाची बातमी चाहत्यांना दिली.
? कोण आहे धनश्री वर्मा..?
▪️ धनश्री वर्मा ही भारतातल्या प्रसिद्ध यू-ट्युबरपैकी एक आहे. धनश्री ही एक दंतवैद्य असून सोबतच यूट्यूबर, धनश्री ही चांगली डान्सर, नृत्यदिग्दर्शिकाही आहे.
▪️ 2014 मध्ये नवी मुंबई डी वाय पाटील डेंटल कॉलेजमध्ये पदवी संपादन केली. तसेच तिची डान्स ॲकॅडमीदेखील आहे.
▪️ चहलने धनश्रीला लग्नाबाबत विचारले होते आणि त्यानंतर धनश्रीने लगेचच चहलला होकार दिला होता. युजवेंद्र चहलची होणारी पत्नी धनश्री वर्मा ही नेहमीच आपल्या भन्नाट डान्समुळे चर्चेत असते.
? चहल आणि धनश्री यांनी हिंदू पद्धतीने गुरगाव येथील कर्मा लेक रिसॉर्ट येथे काल लग्न केले. यावेळी चहल आणि धनश्री यांच्या कपड्यांच्या रंगांमध्येही यावेळी सारखेपणा दिसला.