कोविड `१९ मुळे झालल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांच्या धनादेशांचे वाटप

1125

कोविड `१९ मुळे झालल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५० लाखांच्या धनादेशांचे वाटप

राज्यामध्ये कोव्हिड-१९ चा प्रादूभाव सुरु झाल्यापासून अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कोव्हिwड-१९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असताना काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या आजाराने मृत्यू झाला. त्यामुळे या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते आज {दि. ६} प्रत्येकी ५० लाख रुपयांच्या धनादेशांचे वाटप करण्यात आले.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब सुखदेव गारुडकर, {नेमणूक- पोलीस मुख्यालय, अहमदनगर} यांना दि. १८/०७/२०२० रोजी कोव्हिड-१९ चा त्रास होवू लागल्याने त्यांना प्रथम सिव्हील हॉस्पिटल, अहमदनगर येथे आणि त्यानंतर एशियन नोबेल हॉस्पिटल, अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

त्यांच्यावर उपचार सुरु असताना दि. २५/०७/२०२० रोजी त्यांचे निधन झाले. पोलीस शिपाई संजय लक्ष्मण पोटे, {नेमणूक- सोनई पो.स्टे.} हे कर्तव्यावर असताना दि. २९/०७/२०२० रोजी त्यांना कोव्हिड-१९ चा त्रास होवू लागल्याने त्यांना प्रथम कोव्हिड केअर सेंटर, नेवासा फाटा, त्यानंतर जिल्हा रुग्नालय, अहमदनगर आणि साईदीप हॉस्पिटल, अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना दि. ०३/०८/२०२० रोजी त्यांचे निधन झाले.

पोहेकॉ संतोष प्रभाकर शेळके, {नेमणूक- पारनेर पो.स्टे.} हे कर्तव्यावर असताना दि. १९/०८/२०२० रोजी त्यांना कोव्हिड-१९ चा त्रास होवू लागल्याने त्यांना सक्कर चौकातल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाटी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या उपचार चालू असताना दि. २४/०८/२०२० रोजी त्यांचे निधन झाले.

या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनातर्फे ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे मयत पोलीस कर्मचारी स.पो.उप.निरी./आबासाहेब सुखदेव गारुडकर, नेमणूक- पोलीस मुख्यालय, अहमदनगर, पोशि/१०४० संजय लक्ष्मण पोटे, नेमणूक- सोनई पो.स्टे. पोहेकॉ/८४२ संतोष प्रभाकर शेळके; नेमणूक- पारनेर पो.स्टे. यांचे नातेवाईकांना जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते ५० लाख रुपयांच्या रकमेच्या धनादेशाचे पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर येथे वाटप करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here