शारदीय नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर बंद राहणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. असे बुधवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. तर हा उत्सव मंदिर अंतर्गत साजरा करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात नियोजनाची बैठकीत मंदिरातील सर्व धार्मिक विधी शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात अद्यापही मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नवरात्र उत्सवामध्ये मंदिर सुरू करण्यात यावे. अशी मागणी होत असली तरी अद्याप याबाबत शासनाने निर्णय घेतला नाही. यंदा साडेतीन खंडपीठात पैकी एक असलेल्या कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असणार नाहीत. ‘मंदिरामध्ये भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र परंपरेनुसार मंदिरा अंतर्गत धार्मिक विधी केले जाणार आहेत’.