कोरोनाच्या ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना उन्हाळी रजा अनुज्ञेय असल्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करावे -बाबासाहेब बोडखे
शिक्षक परिषदेचे शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालकांना निवेदन
अहमदनगर(प्रतिनिधी)- उन्हाळी सुट्ट्यांच्या काळावधीत कोरोनाच्या कामाकरिता सेवा देणार्या शिक्षकांना नियम क्रमांक 16, उपनियम क्रमांक 18 (अ) मधील तरतुदीनुसार अर्जित रजा अनुज्ञेय असल्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी व शिक्षण संचालक द. गो. जगताप यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक कोरोनाच्या कामाकरिता सेवा देत आहेत. त्या शिक्षकांना महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्याशर्ती) नियमावली 1981 मधील नियम क्रमांक 16, उपनियम क्रमांक 18 (अ) मधील तरतुदीनुसार अर्जित रजा अनुज्ञेय आहे. याबाबत तक्रारी उद्भवू नयेत, यादृष्टीने परिपत्रक निर्गमित करणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या काळावधीत कोरोनाच्या कामाकरिता सेवा देणार्या शिक्षकांना नियम क्रमांक 16, उपनियम क्रमांक 18 (अ) मधील तरतुदीनुसार अर्जित रजा अनुज्ञेय असल्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील शिक्षक परिषदेचे बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, सखाराम गारूडकर, अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल काकर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, महादेव देवकर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, प्रविण उकीर्डे, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, सत्यवान थोरे, प्रदीप बोरूडे, युनूस शेख आदी प्रयत्नशील आहेत.
Wajid shaikh