‘कुंकुमार्चन‘ ह्या लघुपटची नामांकित “35th Oscar Qualifying Edmonton International Film Festival” मध्ये अधिकृत निवड झाली आहे. हा फेस्टिव्हल Academy Award आणि Canadian Screen Award Qualifying असून जागतिक चित्रपट महोत्सवातील एक प्रमुख चित्रपट महोत्सव मानला जातो.
1 ते 10 ऑक्टोबर दरम्यान कुंकुमार्चन लघुपट Alberta Province Canada येथे फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

“कुंकुमार्चन” हा लघुपट आई आणि दिव्यांग मुलाच्या जीवनावर आधारित आहे. अहमदनगरचे नाट्य सिनेमा लेखक श्री अभिजीत दळवी यांचं हे पहिलं दिग्दर्शन असून लघुपटाची मूळ कथा ही श्री कौस्तुभ केळकर यांची आहे. कथा विस्तार, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अभिजीत दळवी यांनी केले आहे. या लघुपटातून श्री पुष्कर तांबोळी श्री प्रणित मेढे श्री अभिजीत दळवी यांनी निर्मितीचे पहिले पाऊल टाकले आहे. या लघुपटाचे निर्मितीमूल्य उत्तम होण्यासाठी श्री नरेंद्र फिरोदिया यांचे फार मोठे योगदान लाभले असून प्रस्तुतीसाठी अनुष्का मोशन पिक्चर्स & इंटरटेनमेंट ने काम पाहिले
टिम कुंकुमार्चन च्या सर्व कलाकार तंत्रद्य यांचे महा 24 News तर्फे अभिनंदन आणि शुभेच्छा .