कार नदीच्या पाण्यात पडली ; पोहणे येत असल्याने चालक बचावला

1034

कार नदीच्या पाण्यात पडली ; पोहणे येत असल्याने चालक बचावला

 

Slider

 मुख्य संपादक: संजय पांडे Send an email1 day ago

0 145 Less than a minute

कोल्हापूर :- बंधाऱ्या वरून गाडी थेट पाण्यात पडली आणि पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहू लागली. संकट ओळखून चालक गाडी बाहेर आला आणि पोहणे येत असल्याने तो काठाला लागला. पाण्याबाहेर येण्यासाठी गावकऱ्यांनी मदत केल्याने तो पाण्याबाहेर सुखरूप येऊ शकला. या घटने नंतर ‘ देव तारी त्याला कोण मारी ‘ या चर्चेला उधाण आले होते.

                      घटना कसबा बावडा परिसरात असणाऱ्या पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्या वरील आहे. जयजीत श्रीकांत भोसले (३९, रविवार पेठ) हे  वडणगे (ता.करवीर) वरून राजाराम बंधारा मार्गे कसबा बावड्याच्या दिशेने बंधाऱ्या वरून कार ने येत असतांना कार नदीत पडली आणि पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली.  काठवरील नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी बंधाऱ्या कडे धाव घेतली .प्रसांगवधान राखून चालक श्रीकांत भोसले हे गाडीच्या बाहेर आले.त्यांना पोहणे येत असल्याने त्यांनी ते काठच्या दिशेने येऊ लागले. काठावर असलेल्या लोकांनी त्यांना वर येण्यास मदत केली . 

             पण कार नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहू लागली.घटनेबाबत शाहूपुरी पोलिसांना कळविण्यात आले आहे.पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन मोटारीचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here