कांदा स्वस्त करण्याऐवजी ‘एवढं’ करा; रोहित पवारांनी केंद्राला बरोब्बर पकडले!
सर्वसामान्यांना महागाईचा फटका बसू नये म्हणून कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याचं सांगणाऱ्या केंद्र सरकारला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नेमका सल्ला दिला आहे.
अहमदनगर: कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला देशभरातून विरोध सुरू झाला आहे. मात्र, कांद्याचे भाव वाढल्याने सामान्य ग्राहकांना फटका बसू नये, यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. यावर कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला वेगळा उपाय सुचविला आहे. सरकारला सामान्यांना दिलासा द्यायचा असेल तर कांदा नियंत्रित करण्याऐवजी वाढलेले पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत, अशी सूचना पवार यांनी केली आहे.