कर न भरलेल्या जप्त वाहनांचा जाहिर लिलाव

1144

कर न भरलेल्या जप्त वाहनांचा जाहिर लिलाव
पुणे दि. 8 :- कर न भरलेल्या विविध गुन्हया अंतर्गत जप्त केलेल्या २० वाहनांचा लिलाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड येथे दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आला आहे.
ही वाहने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, मोशी प्राधिकरण पिंपरी चिंचवड येथील आवारात दिनांक दिनांक १० ऑगस्ट 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. जाहिर ई-लिलावात एकूण २० वाहने उपलब्ध आहेत. यात बस, ट्रक, एमजीव्ही, पिकअप व्हॅन, टूरिस्ट टॅक्सी या वाहनांचा समावेश आहे. ई-लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहील, याची वाहन मालकांनी नोंद घ्यावी.
ई-लिलाव होणा-या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, तहसिलदार, पुणे शहर व हवेली जुन्नर, मावळ, मुळशी, खेड, जुन्नर, आंबेगाव व उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड यांचे सूचना फलकांवर जनतेच्या माहितीसाठी लावण्यात आली आहे. इच्छुक व्यक्तींना वाहनांची प्रत्यक्ष पाहणी वाहने अटकावून ठेवलेल्या स्थळी करता येईल. जाहिर ई-लिलावात सहभागी होण्यासाठी 10 ऑगस्ट 2021 पर्यंत www.eauction.gov.in या संकेत स्थळावर नाव नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध असेल. ऑनलाईन नाव नोंदणी झाल्या नंतर उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथे खटला विभागात सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत प्रत्येक वाहनासाठी रु. ५००००/- (रुपये पन्नास हजार) रकमेचा “DY RTO PIMPRI CHINCHWAD” या नावे अनामत रक्कमेचा डीमांड ड्राफ्ट सह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती नाव नोंदणी करणे व कागदपत्रे पडताळणी करून घेणे साठी सादर करणे गरजेचे आहे. सदर वाहने “जशी आहेत तशी” या तत्वावर जाहिर ई-लिलावाव्दारे विकली जातील. कोणतेही कारण न देता सदर जाहिर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.
00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here