कर्मचाऱ्यांना विनामोबदला ओव्हरटाईम देता येणार नाही:

1009

कर्मचाऱ्यांना विनामोबदला ओव्हरटाईम देता येणार नाही: सुप्रीम कोर्ट*

? कोरोनाचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांकडून विनामोबदला ओव्हरटाईम करून घेणे गैर असल्याचे सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात निकाल देताना म्हटले आहे. ?️ *कोर्टाने काय म्हटले? :* ▪️ घटनात्मक तरतूदींना बाजूला सारत श्रमिकांच्या उचित मोबदल्याच्या अधिकार काढून घेण्याचे कारण कोरोनाची साथ ठरू शकत नाही. ▪️ राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारी आंतरिक आपत्कालीन परिस्थिती आहे असे कोरोना महासाथीबद्दल म्हणता येणार नाही. ▪️ उचित वेतन हे, रोजगाराचा अधिकार आणि जगण्याच्या अधिकाराचा एक भाग असून महासाथीसाठी श्रमिकांवर पूर्ण जबाबदारी टाकणे एक उपयुक्त प्रक्रिया नाही. ❓ *प्रकरण काय? :* गुजरात सरकारने श्रमिकांबाबत एक आदेश जारी करत त्यांना 3 तास अतिरिक्त काम करण्यास सांगितले होते व त्याबदल्यात कोणताही अतिरिक्त मोबदला दिला नव्हता. मात्र सुप्रीम कोर्टाने यावर गुजरात सरकारला फटकारत एप्रिल महिन्यापासून कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइमचा मोबदला द्यावा असे आदेश दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here