बंगळूर* – कर्नाटकच्या सत्तारूढ भाजपमधील धुसफूस वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्या पक्षाचे वजनदार नेते आणि ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. त्यातून त्यांनी बी.एस.येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रिपद धोक्यात असल्याचे संकेत दिले आहेत. तर, येडियुरप्पा समर्थकांनी यत्नाल यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यातून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होत असल्याने कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता बळावली आहे. कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चा वारंवार पुढे येत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने 77 वर्षीय येडियुरप्पा यांचे वाढते वय कारणीभूत ठरत आहे. त्याशिवाय, भाजपमध्ये उत्तर कर्नाटक विरूद्ध राज्याचा उर्वरित भाग अशी गटबाजी सुरू असल्याचेही सातत्याने दिसून येत आहे. अशातच यत्नाल यांनी येडियुरप्पा यांच्याविरोधात बंडाचे संकेत दिले आहेत. उत्तर कर्नाटकमधील जनतेच्या पाठिंब्यामुळे भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या विभागातून मोठ्या संख्येने भाजपचे आमदार निवडून आले. त्याची जाणीव पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही आहे. येडियुरप्पा यांचा वारसदार उत्तर कर्नाटकातील असावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनात आहे. त्यामुळे येडियुरप्पा फार काळ मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असे यत्नाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले. यत्नाल यांच्या दाव्यावर प्रदेश भाजपमधूनच तीव्र प्रतिक्रिया उमटली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी यत्नाल यांचा दावा फेटाळून लावला. पुढील तीन वर्षे मुख्यमंत्रिपदावर येडियुरप्पाच राहतील, असे त्यांनी म्हटले. तर येडियुरप्पा यांच्या एका समर्थक आमदाराने यत्नाल स्वप्न पाहत असल्याची खिल्ली उडवली. त्यामुळे सत्तारूढ गोटातील तीव्र मतभेदही चव्हाट्यावर आले.
ताजी बातमी
महायुती तुटली; राजकारण फिरल, भाजप-राष्ट्रवादीचा शिंदेंना दे धक्का
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. जागोजागी युती, आघाडीबाबत केल्या जात आहेत, तर काही...
मोठी बातमी ! अहिल्यानगर मनपा निवडणूक; मतदार यादी संदर्भात आयोगाने घेतला मोठा निर्णय
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम-२०२५.
राज्य निवडणूक आयोगाने दि. ०४...
कोल्हे गटाला धक्का; आ. आशुतोष काळे यांच्याकडून काका कोयटे यांना कोपरगावची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आ. आशुतोष काळे यांनी आगामी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष...
चर्चेत असलेला विषय
राज्यात आज, 4,575 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,914 कोरोना बाधित...
राज्यात आज, 4,575 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5,914 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 62,27,219 रुग्ण बरे...
तोपर्यंत सत्ताबदलाची शक्यता नाही हसन मुश्रीफ यांचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर
मुंबई- देशात होत असलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 10 मार्च रोजी लागणार आहे. राज्यात सत्ताबदल होणार असल्याच्या विधान भारतीय जनता पक्षाचे...
2024 च्या निवडणुकीच्या 400 दिवस आधी पंतप्रधान मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना मुस्लिमांशी जोडण्याचा सल्ला दिला
नरेंद्र मोदींनी भाजप कार्यकर्त्यांनी चित्रपटांसारख्या असंबद्ध मुद्द्यांवर अनावश्यक भाष्य करण्यापासून दूर राहण्याची सूचना केली कारण ते पक्षाच्या...





