कर्तव्यावर असतांना कोरोनामुळे मृत्यू; दिवंगत तलाठी लोखंडे यांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान

784

अकोला,दि. ६ (जिमाका)- कौलखेड जहागिर ता. अकोला येथील तलाठी अरविंद जयवंतराव लोखंडे यांचे कर्तव्यावर असतांना दि.१५ ऑक्टोबर २०२० कोरोना संसर्गाने निधन झाले. कोविड संक्रमणात कर्तव्य बजावतांना मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबियांना आज शासनाच्या वतीने ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले. अनुदानाचा धनादेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते आज श्रीमती लोखंडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी महसूल गजानन सुरंजे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसिलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here