औरंगाबाद जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर मनपा व जिल्हा प्रशासन विविध प्रतिबंधात्मक निर्णय जाहीर करत आहेत .
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या प्रवाशांची देखील कोरोना चाचणी होणार असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात प्रवेश केल्या जाणाऱ्या मार्गावर कोरोना चाचणी साठी सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यापूर्वी , मनपाच्या वतीने रेल्वे स्टेशन, विमानतळ या ठिकाणी चाचणी करण्यात येत होती पण आता रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांची देखील चाचणी करण्यात येणार आहे .
मनपाने एका दुकानात पाच पेक्षा अधिक ग्राहक आढल्यास १५ दिवस दुकान सील करण्यात येईल , असे देखील स्पष्ट केले आहे .
नागरिकांना लॉकडाऊन नको असेल तर त्यांनी प्रतिबंधात्मक उपायांचे कठोर पालन करणे गरजेचे असल्याचे देखील प्रशासन वारंवार नागरिकांना आवाहन करत आहे.