औरंगाबादेत आज दिवसभरात वाढले 125 रुग्ण तर 7 मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात आज 321 जणांना (मनपा 213, ग्रामीण 108) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 30584 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 125 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 35107 झाली आहे. आजपर्यंत एकूण 990 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3533 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 52 आणि ग्रामीण भागात 13 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (41)

नारळीबाग परिसर (1), स्वराज नगर, मुकुंदवाडी (1), शिवाजी नगर, गारखेडा परिसर (1), सारंग सो., गारखेडा (2), विशाल नगर (1), एन सात सिडको (1), एन अकरा हडको (1), बन्सीलाल नगर, स्टेशन रोड (1), अभिनंदन कॉलनी, इटखेडा (2), शिल्प नगर (1), सोनार गल्ली, पद्मपुरा (1), कासलीवाल तारांगण, पडेगाव (1), जोहारीवाडा, गुलमंडी (1), जय भवानी नगर (2), बीड बायपास (6), जिजामाता कॉलनी (1), एन बारा, हडको (1), चौधरी इस्टेट, बीड बायपास (1), कमलनयन बजाज हॉस्पीटलजवळ (2), मील कॉर्नर, पोलिस कॉलनी (1), एन आठ (1), भक्ती नगर, पिसादेवी रोड (1), एन सात अयोध्या नगर (1), तापडिया ग्राऊंड परिसर (3), एपीआय कॉर्नर, ठाकरे नगर (1), गुरूप्रसाद नगर (2), एन सहा (1), सुल्तानपूर (1), एन नऊ, सिडको (1)

ग्रामीण (32)

औरंगाबाद (2), गंगापूर (3), कन्नड (1), सिल्लोड (1), वैजापूर (1), पैठण (4), सोयगाव (1) बिडकीन (1), जिवराग टाकळी, सिल्लोड (1), वीरगाव, वैजापूर (1), तीसगाव (2), लासूर स्टेशन (1), खांडसरी परिसर, कन्नड (1), कुंभेफळ (1), टोणगाव (1), दूधड (1), वरूड काझी (2), खालचापाडा शिऊर (1), मिलात नगर, वैजापूर (1), अयोध्या नगर, बजाज नगर (1), सूर्योदय सो., बजाज नगर (1), सिडको कार्यालयाजवळ, बजाज नगर (1), चिंचोली, कन्नड (1), जाधव हॉस्पीटल, सिडको (1)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत एन दोन, आदर्श कॉलनीतील 68 वर्षीय स्त्री, सातारा परिसरातील 51 वर्षीय स्त्री, वडोद बाजार फुलंब्रीतील 65 वर्षीय स्त्री, कन्नड तालुक्यातील पिंपळगाव येथील 70 वर्षीय स्त्री, गणेश कॉलनीतील 60 वर्षीय स्त्री, हर्सुल सावंगीतील 77 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात रायगड नगरातील 95 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here