ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता; राज्य सरकार नियमावली जाहीर करणार

    812

    ? ऑक्टोबरमध्ये राज्यात रेस्टॉरंट्स सुरु होण्याची शक्यता; राज्य सरकार नियमावली जाहीर करणार

    ? ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट सुरु होण्याची शक्यता आहे. आज मुख्यमंत्री आणि रेस्टॉरंट असोसिएशनच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. त्यावेळी रेस्टॉरंट सुरु करण्याची कार्यपद्धती आधी ठरवली जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

    ? राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

    ?️ आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर येथील रेस्टॉरंट व्यवसायिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते

    ? नेमके रेस्टॉरंट्स कसे सुरु करण्यात येतील? किती टक्के ग्राहकांना रेस्टॉरंट्समध्ये जाण्याची परवानगी असेल? तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नियमांचं काटेकोरपणे पालन करत सरकार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून रेस्टॉरंट्स सुरु करण्यासाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. त्यासाठी नियमावलीही तयार करण्यात येणार आहे.

    ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here