एटीएममध्ये पैसे नसल्यास बॅंकेला होणार दंड, ‘आरबीआय’चा मोठा निर्णय..!
? अनेकदा एटीएममधील पैसे संपल्याने ग्राहकांची गैरसोय होत होती. मात्र, आता एटीएममध्ये पुरेशी रोकड ठेवण्याबाबत बँकांना सतर्क व्हावे लागणार आहे. एटीएममधील रोकड संपल्यास आणि तशी तक्रार कोणी केल्यास रिझर्व्ह बँकेकडून बँकांवर, व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्सवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
? ‘आरबीआय’ने पत्रात म्हटल आहे, की एटीएममध्ये पुरेशी कॅश ठेवण्यासाठी बँका / व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (डब्ल्यूएलएओ) यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. सर्व बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, सीईओंना त्यांची यंत्रणा मजबूत करण्याच्या सुचना ‘आरबीआय’ने दिल्या आहेत.
? कॅश-आऊट्स टाळण्यासाठी, तसेच त्यांच्या यंत्रणा अधिक मजबूत करतील. या संदर्भातील आदेश न पाळल्यास संबंधित बॅंकांना आर्थिक दंड केला जाणार आहे.
‘आरबीआय’ने काय म्हटलंय..?
▪️ 1 ऑक्टोबर 2021 पासून हा नियम लागू होणार.
▪️ एटीएममध्ये महिन्यात 10 तासांपेक्षा जास्त काळ रोख रक्कम उपलब्ध नसल्यास बँकांना 10,000 रुपये दंड आकारला जाईल.
▪️ एखाद्या व्हाईट लेबल एटीएममध्ये रोकड नसल्यास, रोकड पुरविणाऱ्या मुख्य बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖