एकाच दिवशी जिल्ह्यातील १ हजार ५१ रुग्ण झाले कोरोनातून बरे
नगर: जिल्ह्यात आज शुक्रवारी (दि.१८)तब्बल १ हजार ५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३० हजार १३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१५२ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५७, संगमनेर २, राहाता १, पाथर्डी ३, नगर ग्रामीण १, श्रीरामपूर ८, कॅंटोन्मेंट १, नेवासा ५, श्रीगोंदा ५, पारनेर ५, अकोले ८, राहुरी २१, कर्जत १ आणि मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज एक हजार ५१ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २३५, संगमनेर ६६, राहाता १४२, पाथर्डी २९, नगर ग्रा ५५, श्रीरामपूर ७६, कॅन्टोन्मेंट ११, नेवासा ६७, श्रीगोंदा ३२, पारनेर ६२, अकोले ४७, राहुरी ८१, शेवगाव ३६, कोपरगाव ३७, जामखेड ३०, कर्जत ३७, मिलिटरी हॉस्पिटल ०८अशा रुग्णांचा समावेश आहे.







