एकनाथ खडसे हे आमचे मित्र; ते सोबत आले तर… : बाळासाहेब थोरात

भाजपनेते एकनाथ खडसे हे आमचे मित्र आहेत ते आमच्यासोबत आले तर पक्षवाढीसाठी नक्कीच मदत होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. भाजपच्या वरिष्ठ पातळीला प्रचंड अस्वस्थता पाहायला मिळत आहे. भाजपमध्ये अनेक नेते नाराज असल्याचेही थोरात यांनी सांगितले.
एका कार्यक्रम निमित्ताने शुक्रवारी ( ९ आक्टोंबर) मंत्री थोरात यांनी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले,
महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन पुढील महिन्यात एक वर्ष पूर्ण होईल. या वर्षभरात अनेकांनी दर १५ दिवसाला सत्ता बदलाचे वक्तव्य केले होते.

माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविषयी महसुलमंत्री थोरात यांना विचारले असता ते म्हणाले, नाथाभाऊ व मी तीस वर्ष एकत्र राहिलो. वेगवेगळ्या पक्षात असताना मतमतांतरे असतात परंतू ते माझे चांगले मित्र आहेत. त्यांचे विधानसभेतील व विरोधी पक्षनेते म्हणून केलेले काम अत्यंत उल्लेखनीय आहे.

त्यांचा भाजपला फायदा झाला. मात्र, त्यांचा जो सन्मान व्हायला पाहिजे तो झाला नाही. यांचे आम्हाला वाईट वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here