उपमुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; राज्यातील सर्वच इंटर्नशिप करणारे डॉक्टर्स आता अतिरिक्त भत्त्यासाठी पात्र!
? कोरोना काळात डॉक्टरांचे योगदान हे खरंच खूप मोलाचे आहे. आरोग्य विभागाने रुग्णसेवेत खूप मोलाचा वाटा उचलत हि लढाई लढणे सुरु ठेवले आहे. अशातच, पुणे आणि मुंबई इथे इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टर्स ना 30 हजार आणि 39 हजार असा अतिरिक्त भत्ता मिळत आहे.
? इतर जिल्ह्यात मात्र हा भत्ता 11 हजार इतका आहे. यावरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवला होता. अनेक वेळा त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता.
? कोरोना काळात सर्वच डॉक्टर्स झोकून देत काम करत आहेत. मग भत्ता देताना जिल्ह्यानुसार हि विभागणी बरोबर नाही असे त्यांचे म्हणणे होते.
? आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाईन बैठक घेतली त्यात देवेंद्र फडणवीस त्यांच्या निवासस्थानावरून उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांची मागणी मान्य करत, त्यांनी वित्त विभागाने यावर प्रतिकूल प्रतिसाद दिला असला तरी आपण यावर आदेश जारी करू असे आश्वासन दिले आहे.