ई-बाईक घेण्यासाठी राज्य सरकार देणार 12हजार
अहमदाबाद : . गुजरात सरकार विद्यार्थ्यांना वाहन खरेदीसाठी 12 हजार रुपयांची मदत देणार आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी या नव्या योजनेची घोषणा शुक्रवारी केली.
गुजरात सरकारने विद्यार्थ्यांसाठी नवीन योजना आणली आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना इ-बाईक घेण्यासाठी 12 हजार रुपये मदत केली जाणार आहे. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आज याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. मात्र केवळ शालेय विद्यार्थ्यांना ही मदत मिळणार असून इतर नागरिक याचा लाभ घेऊ शकणार नाहीत.
इयत्ता 9 ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार असून 10 हजार वाहनांवर ही मदत दिली जाणार आहे. त्याचबरोबर ई-रिक्षा घेण्यासाठी देखील 48 हजार रुपयांची मदत सरकार देणार आहे. प्रदूषण आणि इतर गोष्टी ध्यानात घेत सरकारने या वाहनांचा वापर वाढावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. जवळपास 5 हजार रिक्षांसाठी मदत दिली जाणार आहे.