इस्काॅनचा दि.१७ ते २३ सप्टेंबर दरम्यान विश्व हरिनाम उत्सव

    851

    इस्काॅनचा दि.१७ ते २३ सप्टेंबर दरम्यान विश्व हरिनाम उत्सव

    नगर – जागतिक महामारी कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे आणि विश्वास शांती लाभावी या सद् हेतूने आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्काॅन) तर्फे गुरूवार दि.१७ सप्टेंबर ते बुधवार दि.२३ सप्टेंबर दरम्यान वर्ल्ड होलीनेम फेस्टीवल ( विश्व हरिनाम उत्सव) चे आयोजन केले आहे. नगर शहर आणि जिल्ह्यातही वर्ल्ड होलीनेम फेस्टीवलनिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगर शहरातील इस्काॅन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी प्रभू यांनी दिली.

    इस्काॅनतर्फे संपूर्ण विश्वभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मेक पिपल फाॅर्च्युनेट या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक व्यक्तीने जागतिक महामारी कोरोनाचे समूळ उच्चाटन व्हावे आणि विश्वास शांती लाभावी अशी प्रार्थना करत हरे कृष्ण… महामंत्रचा जप किमान एक वेळ करावा. हा महामंत्र म्हणतानाचा व्हिडिओ काढून तो राहुल गुजराल (८९०३३९८१६९) किंवा मुकूंद जोरी (७०२८२८४३१६) यांच्या व्हाॅटसअप नंबरवर पाठवावा. जनतेने केलेल्या हरे कृष्ण… महामंत्राचे व्हिडीओ प्राप्त होताच ते सर्व इस्काॅन मंदिराच्या माध्यमातून इंटरनेटवर अपलोड केले जातील.

             रविवार दि.२० सप्टेंबर २०२० ला संडे जपाथाॅन म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा नामजप सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत चालेल. या कालावधीत हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम हरे राम राम राम हरे हरे या महामंत्राच्या  स्टीकर्सचे वाटप सर्वदूर केले जाईल. ५००० लोकांची प्रत्यक्ष भेट घेऊन हरे कृष्ण... महामंत्राच्या स्टीकर्सची भेट दिली जाईल. हा हरे कृष्ण...महामंत्र भाविकांना वेगवेगळ्या शैलीत कल्पकतेने मांडण्यात यावा म्हणून खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी हरे कृष्ण...हा संपूर्ण महामंत्र आपल्या घरीच रंगवून त्या चित्राचा फोटो  मदन थोरात यांच्या ९२७१३८९९२८ या व्हाॅटसअप क्रमांकावर पाठवावा. प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे पाचशे एक, तीनशे एक व दोनशे एक रूपयांची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.
    
              दि.१७ ते २३ सप्टेंबर २०२० च्या कालावधीत दररोज सायंकाळी ५ ते ९ या वेळेत इस्काॅनतर्फे विविध कार्यक्रम होणार असून ते http://youtube.com/iskcondesiretree तसेच https://www.facebook.com/ISKCONKirtanMinistry/ या  लिंकवर पहाता येतील. तसेच सायंकाळी ५ ते ६ या वेळेत नगर शहरातील वेगवेगळ्या भागात हरे कृष्ण... महामंत्र कीर्तनाची गाडी फिरवली जाईल. घरात बसलेल्या सर्वांच्या कानावर हा महामंत्र पडावा व त्यांच्याकडून हरे कृष्ण... महामंत्राचे उच्चारण व्हावे या सद् हेतूने ही गाडी नगर शहरातील अधिकाधिक भागात पोहोचेल. तसेच नगर शहरासह जिल्ह्यातील घराघरात किमान एक तास कुटूंबातील सर्वांनी हरे कृष्ण... महामंत्राचे कीर्तन करावे, या वर्ल्ड होलीनेम फेस्टीवलमध्ये साधक आणि भक्तांनी स्वयंस्फूर्तीने व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इस्काॅन मंदिराचे व्यवस्थापक गिरीवरधारी प्रभू यांनी केले आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here