इंदू मिल: मुद्यावरून कोणीही राजकारण करू नये- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभं करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. त्यामुळे या मुद्यावरून कोणीही राजकारण करू नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
इंदू मिलवरील जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या पुतळ्याच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वांच्या सहभागानं पायाभरणी होणार असल्याचं सांगितलं आहे.
एमएमआरडीएने राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली होती. त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केलं होतं. मात्र अशा कार्यक्रमात सर्वांचा सहभााग असणं गरजेचं असल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असल्याचं ठाकरेंनी सांगितलं.