आज भिडणार सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 29व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्जचा संघ (Sunrisers Hyderabad Vs Chennai Super Kings) आज एकमेकांशी भिडणार आहेत.

दुबई आंतरराष्ट्रीय स्डेडिअमवर हा सामना खेळला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व महेंद्र सिंह धोनी करत आहेत. तर, सनरायझर्स हैदराबादच्या संघाचे कर्णधार पद ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वार्नर संभाळत आहे.

▪️भारतीय वेळेनुसार, आज 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे.

?चेन्नई आणि हैदराबादच्या संघाला या हंगामात चांगले प्रदर्शन करता आले नाही. चेन्नई आणि बंगळरू या दोन्ही संघाला आपपल्या मागील सामन्यात पराभव पत्कारावा लागला होता.

?चेन्नईच्या संघाने या हंगामात 7 सामने खेळले असून केवळ दोन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, हैदराबादच्या संघाने 7 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. यामुळे आजचा सामना चेन्नईच्या संघासाठी महत्वाचा ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here