आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे रेमडेसिवीर इंजेक्शन प्रशासनाकडे आमदार संग्राम जगताप यांनी सुपूर्त केले.
नगर शहरासह जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती बाबतचा प्रशासनाकडून दररोज आढावा घेऊन आमदार संग्राम जगताप राज्याचे आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे यांच्याशी संपर्कात असून शहरात कुठलेही औषध कमी पडून देणार नाही. असे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले
मागील तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्यासोबत रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा बाबत बैठक घेण्यात आली होती. यावेळी असे निदर्शनास आले की, जिल्हा भरातून येणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.नगर शहरामधील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांना आमदार संग्राम जगताप यांनी फोन केला असता त्यांनी ही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून दिले व कर्जत जामखेड चे सहकारी मित्र आमदार रोहित पवार यांच्यामार्फत नगर शहरामध्ये रेमडेसिविर इंजेक्शन पाठवण्यात आले.
गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणूंचा संसर्ग महाराष्ट्र मध्ये उद्रेक करत आहे. त्यामुळे नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच संपूर्ण महाराष्ट्र भर रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसले आहे. देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्याकडे मागील वर्षी ही रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना फोन केला असता त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आले होते. यावेळी उद्योजक सुजित काकडे उपस्थित होते.
Sharad Pawar Rajesh Tope Rohit Rajendra Pawar






